
आश्रयसाठी २९ कोटींचा सल्ला
मुंबई, ता. २८ : सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा तीन हजार कोटींहून अधिक खर्चाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. त्याचे कंत्राटही देण्यात आले आहे. आता या प्रकल्पासाठी प्रकल्प सल्लगार नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका २९ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
सफाई कामगार आता १५० चौरस फुटांपर्यंतच्या घरात राहत होते. आता पुनर्विकासात त्यांना ३०० चौरस फुटांची सेवा निवासस्थाने देण्यात येणार आहेत. यातील २२ वसाहतींच्या पुनर्विकासाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी पालिका प्रकल्प सल्लागार नियुक्त करीत आहे. या प्रकल्प सल्लागारांना प्रकल्पाच्या १ ते २ टक्के रक्कम म्हणून शुल्क देण्यात येणार आहे. तसे प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आले आहेत. २२ वसाहतींच्या पुनर्विकासाच्या सल्लागारांसाठी पालिका २९ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च पालिका करणार आहे.
...
विविध परवानग्या
इमारतीचे संकल्पचित्र आराखडे तपासण्यासह विविध पातळ्यांवर मंजुरी मिळवण्यासाठी सल्लागाराला साह्य करायचे आहे. तसेच, सागरी नियमन क्षेत्रासह इतर शासकीय परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी सल्लागाराची असेल. कामाचा नियमित आढावा घेण्यासह कामाच्या दर्जावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही सल्लागाराची आहे.
...
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..