
रिक्षाचालकने विद्यार्थ्यांना लुटले
पुणे, ता. ७ ः वाढदिवसानिमित्त वडिलांनी गावाहून पाठविलेल्या भेटवस्तू आणण्यासाठी रात्रीच्यावेळी रिक्षाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने लुटले. विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम व ऑनलाइन माध्यमाद्वारे पैसे घेऊन दोघेही रिक्षाचालक पसार झाला.
याप्रकरणी अनुप शिवहरी शिगोंकर (वय १८, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) या विद्यार्थ्याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनुप हा बुलडाण्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. अनुपचा वाढदिवस असल्याने त्याच्या वडिलांनी वाढदिवसासाठी त्यास शेगाव येथून खासगी ट्रॅव्हल्समधून भेटवस्तू पाठविल्या होत्या. त्या घेण्यासाठी तो रविवारी साडेपाचच्या सुमारास संगमवाडी येथील खासगी ट्रॅव्हल्स बसच्या स्थानकाकडे निघाला. त्याचा मित्र सार्थक मालखेडे व तो रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षातून निघाले होते. त्यावेळी रिक्षाचालकाचे साथीदारही रिक्षात होते. त्यांची रिक्षा मंगळवार पेठेत आली, त्यावेळी त्याने रेल्वे पुलाखाली अंधारामध्ये रिक्षा थांबविली. त्यानंतर रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी अनुप व सार्थक या दोघांनाही चाकूचा धाक दाखवून धमकी दिली. त्यानंतर त्यांनी अनुपकडील दोन मोबाईल संच, त्याचा मित्र साथर्कच्या खिशातील एक हजार रुपयांची रोकड लुटली. रिक्षाचालकाने त्यांना धमकावून ऑनलाइन ऍपपद्वारे दोन हजारांची रोकड पाठविण्यास सांगितले. रिक्षाचालकाने त्यांच्याकडील २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून नेला. या घटनेनंतर रिक्षाचालक व त्याचे साथीदार पसार झाले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..