मुंबई विद्यापीठाच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र का नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठाच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र का नाही?
मुंबई विद्यापीठाच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र का नाही?

मुंबई विद्यापीठाच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र का नाही?

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात उभारलेल्या ३८ इमारतींना आजवर पालिका प्रशासनाने भोगवटा प्रमाणपत्र दिलेले नाही. यासंदर्भात माहिती अधिकारात मागवलेला तपशील देण्यास विद्यापीठ कुलगुरू सुहास पेडणेकर गेले आठ महिने टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
आजतागायत विद्यापीठ प्राधिकरणाकडून आवश्यक पूर्ततेसह ओसी देण्याचा कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे कुलगुरू यांना ओसीसंदर्भात पत्र पाठवूनही मुंबई विद्यापीठाने त्या पत्रास गांभीर्याने घेतले नसल्याचा दावा गलगली यांनी केला आहे.
ऑटोडीसीआर ऑनलाईन प्रणालीमार्फत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास भोगवटा प्रमाणपत्र मिळवले जाऊ शकते. आता तर कुलगुरू हेच लक्ष देत नसल्याने त्यांच्यावर कुलपती आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
...
१९७५ नंतरच्या इमारतींना प्रमाणपत्र नाही
मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरातील ६३ पैकी ३८ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिलालेले नाही. या इमारती १९७५ पासून २०१७ दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत. एकूण ६३ इमारतींपैकी फक्त २५ इमारतींना ओसी मिळाली असून ३८ इमारतींना ओसी अद्याप मिळाली नाही. एका इमारतीस अंशतः भोगवटा प्रमाणपत्र आहे.