
जुने पारगावात तरुणाची आत्महत्या
६५३०
जुने पारगावात तरुणाची
गळफास घेऊन आत्महत्या
कर्जफेडीच्या तगाद्यामुळे उचलले पाऊल
घुणकी, ता. ९ : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील प्रवीण दिलीप पोवार (वय ३०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : प्रवीण पोवार याने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन बारा चाकी ट्रक घेतला होता. प्रारंभी काही कर्ज हप्ते भरले मात्र कोरोना काळात हप्ते भरले नाहीत. कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी तगादा लावला होता. यामध्ये प्रवीणला नैराश्य आले त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलले असल्याची माहिती प्रवीणचे चुलते संपत पोवार यांनी दिली.
प्रवीण शुक्रवारी घरातून बाहेर पडला व पुन्हा घरी आलाच नाही. जुने पारगाव - निलेवाडी रस्त्यावर झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीणचा भाऊ प्रशांत याने फिर्याद दिली आहे. त्याच्या मागे आई व भाऊ असा परिवार आहे. नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी अनिता शहा यांनी उत्तरीय तपासणी केली. वडगावचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक घोडके व नरसिंह कुंभार तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..