BMC
BMCsakal media

BMC चा अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर; आयुक्तांनी दोन मिनिटांत संपवलं भाषण

मुंबई : मुंबई महापालिकेचा (BMC) ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प (budget) शुक्रवारी महासभेत चर्चेविना काही मिनिटांतच मंजूर करण्यात आला. स्थायी समितीने (Standing committee) मंजूर केलेल्या ६५० कोटी रुपयांच्या फेरफारीसह हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असला, तरी नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या (corporates) शिफारशीनुसार हा निधी वापरण्यात येणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून सभागृहाचे कामकाज पूर्ण करण्यात आले.

BMC
ठाणे : अखेर जिल्हा रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गुरुवारी हा अर्थसंकल्प महासभेच्या पटलावर मांडला. गटनेत्यांसह ज्येष्ठ नगरसेवकांना भूमिका मांडता यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र कोणत्याही चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्प मंजूर होताना आयुक्त नगरसेवकांनी केलेल्या सूचनांबाबत भूमिका स्पष्ट करतात. मात्र, आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी अवघ्या दोन मिनिटांत आपले भाषण संपवले. शिवसेनेसह, भाजप, काँग्रेस या सर्वच पक्षांचे नगरसेवकही चक्रावून गेले. ऑनलाईन बैठक असल्याने नगरसेवकही गाफील होते. अनेकांना अर्थसंकल्प मंजूर झाला तेही कळले नाही, अशी नाराजीही नगरसेवकांनी व्यक्त केली.

BMC
नवी मुंबई : फुटबॉल प्रिमिअर लीगचे आयोजन; महिला फुटबॉलपटू घडविण्यावर भर

निवडणूक जाहीर न झाल्याने फक्त प्रशासनाला अर्थसंकल्प वापरता येणार आहे. निवडून आल्यानंतर नगरसेवकांना नगरसेवक निधी किंवा इतर तरतुदींचा उपयोग आहे.
- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

स्थायी समितीत झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेता म्हणून भाषण केले. पायाभूत सुविधांसाठी पालिकेने काय केले पाहिजे, याबाबत सूचना केल्या होत्या. पालिकेची मुदत संपत असल्याने नवीन पालिकेत अर्थसंकल्प अंमलबजावणीस अर्थ राहणार आहे.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते

चर्चेविना अनेक प्रस्ताव मंजूर होऊ लागले आहेत. चर्चा करण्याची मागणी केली, तर दुर्लक्ष केले जाते. सत्ताधारी शिवसेना मुकी व बहिरी तर झाली नाही ना, अशी शंका वाटू लागली आहे.
- प्रभाकर शिंदे, गटनेते, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com