सोने चोरणा-या सराईत टोळीतील सहा जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोने चोरणा-या सराईत टोळीतील सहा जणांना अटक
सोने चोरणा-या सराईत टोळीतील सहा जणांना अटक

सोने चोरणा-या सराईत टोळीतील सहा जणांना अटक

sakal_logo
By
सोने चोरणाऱ्या टोळीतील सहा जणांना अटक खोपोली पोलिसांची कारवाई खोपोली, ता. ५ (बातमीदार) : येथील पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सापळा लावून सोने चोरी गुन्ह्यातील पाच पुरुष आणि एका महिलेस ताब्यात घेतले. शहरात काही दिवसांपासून घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांनी पथक तयार केले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राकेश कदम यांच्या पथकाने गोरेगाव ठाणे हद्दीतील एका ज्वेलर्स दुकानातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या संशयित व्यक्तींचे सीसी टीव्ही चित्रीकरण पाहिले होते. खोपोली परिसरातील सोने चोरी प्रकरणातील सीसी टीव्ही चित्रीकरणाबरोबर मिळतेजुळते असल्याचे दिसले. त्यानुसार खोपोली पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी (ता.३) पहाटेच्या सुमारास पुणे ते मुंबई मार्गावर चंदेरी रंगाची कार प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक राकेश कदम आणि पोलिस पथकाने फॉरेस्ट चौकी येथे सापळा रचून वाहनातील ५ पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता गोरेगांव येथील ज्वेलर्समध्ये चोरी केल्याची कबुली दिली. अटक आरोपींची नावे नवजीत विनोद वाणी (२४, रा.खर्डा, ता.जामखेड), अजय सुरेश परमल, (३१, अंबरनाथ), विजय सुरेश परमल, (२८, अंबरनाथ), सूरज मदनसिंग कछवाय, (३३ , रा. कात्रज), गणेश मदनसिंग कछवाय, (३६ कामाठीपुरा), शीतल अमित चव्हाण, (३२, रा. शास्त्रीनगर, अंबरनाथ) अशी आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत केली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top