मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉकSakal

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत.

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी विविध कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर दिवा स्थानकावरील जुनी रूट रिले इंटरलॉकिंग इमारत पाडणे, अप आणि डाऊन जलद मार्ग स्लीव्हिंगचे काम,  ओएचई स्लीव्हिंग आणि क्रॉस ओव्हर पॉइंटचे काम करण्यात येणार आहे; तर हार्बर रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील; तर ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. त्याशिवाय २ एप्रिल रात्री ९ ते ३ एप्रिल सकाळी ७ वाजेपर्यंत अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असल्याने हार्बर मार्गावरील अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यानची उपनगरीय सेवा बंद राहतील.

मध्य रेल्वे
कुठे - ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी - सकाळी  ९  ते रात्री  ९  पर्यंत.

हार्बर रेल्वे  
कुठे -  पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)
कधी - सकाळी  ११.०५  ते दुपारी  ४.०५  वाजेपर्यंत

पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
कधी : शनिवारी, रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com