गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगारांना मदत
करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा
गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा

गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये आरोपी असलेल्यांना मदत करणाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले.
मानखुर्द येथील दरोडेखोरीच्या आरोपात गुन्हा दाखल झालेल्या राजेंद्र पिटोळे यांनी न्यायालयात याचिका केली होती. मे २०२१ मध्ये अन्य काही आरोपींनी हा दरोडा घातला होता. यामध्ये काही स्थानिक नागरिक जखमी झाले होते; मात्र या प्रकरणात मी सहभागी नव्हतो आणि पोलिसांनी पहिल्या तक्रारीमध्ये माझा उल्लेख केला नव्हता. मला या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर माझे नाव पोलिसांनी नमूद केले. मी केवळ काही जणांना माझ्या गावी राहण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे माझ्या विरोधात केलेली फिर्याद रद्दबातल करावी, असा युक्तिवाद पिटोळे यांच्याकडून करण्यात आला; मात्र पोलिसांनी त्याला विरोध केला.
न्या. पी. बी. वराळे आणि न्या. एस. एम. मोडक यांनी याचिकादाराचा दावा अमान्य केला. प्रत्यक्ष घटनेत आरोपीचा सहभाग नसला तरी त्याने आरोपींना अटक टाळण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मदत केली. यामुळे हा प्रकार संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये येतो, असेही खंडपीठाने नमूद केले आणि तक्रार रद्द करण्यास नकार दिला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top