
धीरज वाधवानला उपचार घेण्याची परवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी व्यावसायिक धीरज वाधवानला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने आज दिली. कारागृह आरोपींचेदेखील जगण्याचे मूलभूत अधिकार असतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
वाधवानला तडकाफडकी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश सीबीआय न्यायालयाने दिले होते. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका केली होती. अंबानी रुग्णालयात माझ्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे मला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. उच्च न्यायालयाचे न्या. प्रकाश नाईक यांनी आज हे आदेश रद्दबातल केले. वाधवानला ११ एप्रिलला रुग्णालयात चाचण्यांसाठी न्यावे, तेथे शस्त्रक्रियेची तारीख आणि नियोजन करावे आणि वैद्यकीय सल्ल्याने पुढील वेळापत्रक ठरवावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..