जलसाक्षर पिढी घडवण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलसाक्षर पिढी घडवण्याची गरज
जलसाक्षर पिढी घडवण्याची गरज

जलसाक्षर पिढी घडवण्याची गरज

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : जलसंवर्धनासारख्या विषयांवर देशाची युवा पिढी गांभीर्याने विचार करेल, त्या वेळी देशाचे भविष्य उज्ज्वल असेल. पाणी या विषयावर सर्वसमावेशक विचारमंथन होणे गरजेचे आहे. जलसाक्षर पिढी घडवण्याची गरज असून तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले. दरम्यान, २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहोचवणार असल्याचा मानसही शेखावत यांनी व्यक्त केला.
शेखावत म्हणाले, शासनाकडून जलव्यवस्थापन व जलसंवर्धनाच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रकल्प यशस्वीरीत्या राबवण्यासाठी चार घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे राजकीय इच्छाशक्ती, सार्वजनिक स्वरूपातील निधी, कृतीशील धोरण आणि लोकसहभाग यांचा समावेश आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनात अग्रक्रमी पोहोचण्यासाठी भविष्यात जलसाक्षर पिढी घडवण्याची गरज आहे. हे सर्व जलसमृद्धीच्या माध्यमातून शक्य आहे. जलसमृद्धी ही केवळ लोकसहभागातून घडणार आहे. त्यामुळे पाण्याचे मूल्य सामान्यांनी ओळखले पाहिजे.
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायचा असेल, तर सर्वप्रथम शेतीतील पाणी वाचवण्याकडे लक्ष वेधले पाहिजे. भविष्यात जलस्रोत जपण्यासाठी आताच्या पिढीला या स्रोतांची माहिती असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पाणथळ जमिनी, तंत्रज्ञानाच्या साथीने जलव्यवस्थापन, जलपुनर्वापर अशा अनेक क्षेत्रात शासनाकडून काम सुरू असल्याची माहिती शेखावत यांनी दिली.
----
राज्यातील २६ प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी
१९७० सालापासून अनेक प्रकल्प हे केवळ कागदावरच होते, तर काही प्रकल्प बंद पडले होते; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंपत्तीचे वैभव टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या प्रकल्पांचा पुन्हा अभ्यास करून त्यापैकी १०६ प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केले. त्यातील २६ प्रकल्प-योजना महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने ७० हजार कोटींची तरतूद केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top