नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
मुंबई, ता. १२ : आयएनएस विक्रांत युद्धनौका जतन करण्यासाठी निधी जमा केल्याच्या प्रकरणात अडचणीत आलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आज दुसरा झटका बसला. सोमय्या यांचे नगरसेवक पुत्र नील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज तातडीने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून बुधवारी (ता. १३) त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नील सोमय्या यांच्या जामिनावर आज सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी निकाल जाहीर केला. या प्रकरणात सुमारे ५७ कोटी रुपयांच्या निधीसंकलनाची कागदपत्रे दाखल झाली आहेत. त्यामुळे निधी जमा केल्याचे स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सत्र न्यायालयाने सोमवारी किरीट सोमय्या यांचा जामीन फेटाळला. अटक होण्याची शक्यता असल्यामुळे आता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून बुधवारी पिता-पुत्रांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे ही सुनावणी तातडीने घेण्याची मागणी सोमय्या यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.