
लहान मुलांना आजी आजोबांचे प्रेम आवश्यकच
मुंबई : लहान मुलांना आई-वडिलांबरोबर आजी-आजोबांचे प्रेमदेखील मिळायला हवे, तो त्यांचा अधिकार असून त्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी हे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले असून, दोन वर्षांनंतर वडिलांना त्यांच्या मुलांना भेटण्याची परवानगी दिली.
आईच्या ताब्यात असलेल्या मुलांना जून २०२० पासून वडिलांना भेटू दिले जात नाही, असा आरोप करत एका पित्याने अॅड. अजिंक्य उडाने यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. या याचिकेच्या निकालाची प्रत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जी मुले आई-वडिलांपासून वेगळी राहतात, त्यांना त्यांच्या प्रेमापासून वंचित ठेवता येणार नाही. मुलांना अशा प्रकारे वेगळे ठेवणे योग्य नाही, त्यांना आई-वडिलांबरोबर आजी आजोबांचे प्रेम मिळायला हवे, ती त्यांची गरज आणि अधिकार आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आजोबांची तब्येत ठीक नसून त्यांनी आपल्या नातवाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून दोन दिवस नातवाला भेटण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी न्यायालयाने त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी नातवाला भेटण्याची परवानगी दिली होती; मात्र आईने याला विरोध करून भेट घेऊ दिली नाही.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..