
धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिस कोठडी
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देत रेणू शर्मा नामक महिलेने त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितली होती. याप्रकरणी शर्मा हिला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मुंडे यांच्यावर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा आरोप करणाऱ्या शर्माच्या बहिणीविरोधात मुंडे यांनी गतवर्षी तक्रार दाखल केली होती; तर शर्माच्या बहिणीने मुंडेंविरोधात गतवर्षी जानेवारी महिन्यात बलात्काराची फिर्याद दाखल केली होती; मात्र दुसऱ्याच दिवशी सदर तक्रार मागे घेण्यात आली.
त्यानंतर तिने मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपये, एक दुकान, महागडा स्मार्टफोन आणि अन्य खर्चिक भेटवस्तू मागितल्या होत्या. या वस्तू न दिल्यास मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करेन, अशी धमकी दिली होती. मुंडे यांनी सुरुवातीला तक्रारदार महिलेला तीन लाख रुपये आणि दीड लाखांचा स्मार्टफोन दिला होता; मात्र तरीही तिचे धमकावणे सुरू राहिल्याने अखेर मुंडे यांनी मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
मुंबई पोलिसांनी रेणू यांना इंदूर येथून अटक केली. त्यानंतर तिला मुंबईमध्ये ट्रान्झिट रिमांडवर आणण्यात आले. आज मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..