
अर्जुन रामपालच्या मैत्रिणीच्या भाऊ ताब्यात अर्जुन रामपालच्या मैत्रिणीच्या भाऊ ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या मैत्रिणीचा भाऊ अगिसिलाओस डेमेट्रिएडस याला मुंबई पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतले आहे. एनसीबीच्या प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईला आणल्यानंतर अगिसिलाओसची रवानगी आर्थर जेलमध्ये करण्यात येणार असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबई एनसीबीने पीआयटीएनडीपीएस या कायद्याखाली अगिसिलाओस याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता. मात्र, त्याने या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात तो सर्वोच्च न्यायालयात गेला. मात्र सर्वोच्च न्यायालयातही त्याची याचिक फेटाळण्यात आली. पीआयटीएनडीपीएस या कायद्याअंर्तगत अमली पदार्थ तस्करी करण्यापासून थांबवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..