वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे आज लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय महाविद्यालयाच्या 
नव्या इमारतीचे आज लोकार्पण
वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे आज लोकार्पण

वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे आज लोकार्पण

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : बांधकाम पूर्ण होऊनही कूपर रुग्णालयाच्या आवारातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत धूळ खात पडली होती. ‘सकाळ’नेही याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने नव्या इमारतीमध्ये कामकाजास सुरुवात करण्याचे ठरवले आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या (ता. २५) राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होत आहे.
मुंबई महापालिकेचे डॉ. रु. न. कूपर रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवी इमारत बांधण्यात आली. ही नवी इमारत पदवी आण पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगात येणार आहे. तळघर, तळमजला आणि पाच मजले अशा स्वरूपाची या इमारतीची संरचना आहे. सुमारे ३६ हजार ३९७ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये तळमजला ते चौथ्या मजल्यापर्यंतचा वापर वैद्यकीय महाविद्यालयासाठी होणार आहे, तर पाचव्या मजल्यावर सर्व विभागप्रमुखांची कार्यालये असतील. तसेच तळघरामध्ये ५९ चारचाकी वाहने आणि ४९ लहान वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात आले आहे. मध्यवर्ती अंगण, २४० आसन क्षमतेच्या चार वर्गखोल्या, ३०० आसन क्षमतेचे एक परीक्षा सभागृह, ५०० आसन क्षमतेचे एक बहुउद्देशीय सभागृह, प्रात्यक्षिक कक्ष, अभ्यागत कक्ष, ८०० चौरस मीटरची दोन ग्रंथालये, स्वयंपाकगृह, भोजनगृह, वातानुकूलन व्यवस्था, उद्‍वाहन इत्यादी सर्व व्यवस्था या इमारतीत उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.
---
नव्या इमारतीमधील सुविधा
१. तळमजला ः अधिष्ठाता कार्यालय, प्रशासन, अभ्यागत कक्ष, शरीररचना विभाग, आच्छादित अंगण, प्रात्यक्षिक कक्ष, संशोधन प्रयोगशाळा, मध्यवर्ती ग्रंथालय, स्वयंपाकगृह, भोजनगृह.
२. पहिला मजला ः फार्माकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, सेंट्रल लायब्ररी, लायब्ररी (जर्नल सेक्शन), सेंट्रल लायब्ररी, सहा डेमो रुम्स, रिसर्च लॅब, म्युझियम, प्रॅक्टिकल लॅब, स्टाफ फॅसिलिटी रूम, महिला विद्यार्थी कॉमन रूम, पुरुष विद्यार्थी कॉमन रूम.
३. दुसरा मजला ः फिजिओलॉजी, कम्युनिटी मेडिसिन, सहा डेमो रूम्स, रिसर्च लॅब, २४० आसन क्षमतेच्या दोन वर्गखोल्या, ३०० आसन क्षमतेचे एक परीक्षा सभागृह, ५६५ चौरस मीटरचे ग्रंथालय, संग्रहालय, प्रॅक्टिकल लॅब, ऑडिओ व्हिज्युअल रूम्स, एअर हँडलिंग युनिट.
४. तिसरा मजला ः पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सहा डेमो रूम्स, रिसर्च लॅब, २४० आसन क्षमतेच्या दोन वर्गखोल्या, संग्रहालय, प्रॅक्टिकल लॅब
५. चौथा मजला : न्यायवैद्यक औषध विभाग, तीन डेमो रूम्स, रिसर्च लॅब, ५०० आसन क्षमतेचे एक बहुउद्देशीय सभागृह, संग्रहालये, विभागासाठी प्रॅक्टिकल लॅब, तीन परीक्षा सभागृह, पी.जी. विद्यार्थ्यांसाठी कॉमन लॅब.
६. पाचवा मजला : सर्व १३ विभागप्रमुखांची कार्यालये.
....

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top