जंतनाशक गोळी वाटप सप्ताह आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंतनाशक गोळी वाटप सप्ताह आजपासून
जंतनाशक गोळी वाटप सप्ताह आजपासून

जंतनाशक गोळी वाटप सप्ताह आजपासून

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ :  राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या निमित्ताने आजपासून २ मेपर्यंत सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मुला-मुलींचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे पालिका आरोग्य विभागकडून सांगण्यात आले.
या मोहिमेतंर्गत महापालिका आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या मुला-मुलींना गोळी देण्यात येणार आहे. यासाठी सहायक प्रसविका, आरोग्यसेविका, आशा, अंगणवाडी कार्यकर्ते व शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top