एसटीची प्रवासीसंख्या २१ लाखांवर

एसटीची प्रवासीसंख्या २१ लाखांवर

Published on

मुंबई, ता. २५ : गेल्या पाच महिन्यांपासून संपामुळे एसटीची सेवा बंद असल्याने सर्वसामान्यांचा प्रवासच बंद झाला होता. आता मात्र २२ एप्रिलपासून राज्यातील एसटी सेवेचा पुन्हा श्रीगणेशा झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ८ ते १० लाखांपर्यंत असलेली दैनंदिन प्रवासी संख्या २४ एप्रिलपासून तब्बल २१ लाखांवर गेली आहे, तर ११ हजार ६३५ बसगाड्या रस्त्यावर धावत आहे.

उच्च न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार टप्प्याटप्प्याने एसटी कर्मचारी कर्तव्यावर येऊ लागले. त्यानुसार बसफेऱ्यांचेही नियोजन करण्यात येत होते. २२ एप्रिलपूर्वी अंशतः एसटीच्या सेवा सुरू ठेवत सुमारे ५ ते ७ हजार बसगाड्या सुरू होत्या. परंतु सध्या तब्बल ११ हजार ६३५ एसटी बसगाड्या दिवसाला राज्यभरात सेवा देत आहे. त्या माध्यमातून एसटीचे उत्पन्न दैनंदिन १३ कोटी १५ लाखांवर पोहचले आहे. सध्या शिवनेरी २३३, शिवशाही ६६६, हिरकणी ३९३; तर साध्या बसेसच्या ३० हजार ९२४ फेऱ्या होत आहे. त्यामुळे एसटीचा थांबलेला प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्याच्या दृष्टीने एसटीच्या व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडून राज्यभरातील विभाग नियंत्रकांना आणि विभागीय महाव्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
-------------
विभागनिहाय बसफेऱ्यांची संख्या
विभाग- शिवनेरी - शिवशाही - हिरकणी - साधी - एकूण
औरंगाबाद - ० - ५६ - ८३ - ५,८३७ - ५,९७६
मुंबई - १२३ - ११२ - ८५ - ५,६२७ - ५,९४७
नागपूर - ० - ५ - ४ - ३,२९० - ३,२९९
पुणे - ११० - ३४९ - २०९ - ६,८४९ - ७,५१७
नाशिक - ० - १४४ - ८ - ६,३५७ - ६,५०९
अमरावती - ० - ० - ४ - २,९६४ - २,९६८
एकूण - २३३ - ६६६ - ३९३ - ३०,९२४ - ३२,२१६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com