रायगड जिल्ह्यात वाढतेय सायकलची क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड जिल्ह्यात वाढतेय सायकलची क्रेझ
रायगड जिल्ह्यात वाढतेय सायकलची क्रेझ

रायगड जिल्ह्यात वाढतेय सायकलची क्रेझ

sakal_logo
By
सायकलच्या प्रेमात मुले, तरुणाई प्रवासासाठी जुने माध्यम पुन्हा फॉर्मात सुनील पाटकर : सकाळ वृत्तसेवा महाड, ता. ८ : एकेकोळी सायकल हेच प्रवासाचे प्रमुख साधन होते. कालपरत्वे यामध्ये बदल होत गेले. सायकलची जागा स्वयंचलित दुचाकींनी घेतली. त्यानंतर उरल्या त्या सायकलवरील रपेटच्या आठवणी; पण आता पुन्हा सायकलची क्रेझ रायगड जिल्ह्यात वाढली आहे. पर्यावरण रक्षणाबरोबरच आरोग्य विषयक जनजागृती करत अनेक तरुण-मुले तिच्यावरून प्रवास करताना दिसतात. रायगड जिल्ह्यात अनेक सायकल ग्रुप तयार झाले आहेत. त्यांचे अनेक कार्यक्रमही होत आहेत. महाडमधील सिस्केप आणि युथ हॉस्टेल महाड युनिटने मुलांसाठी महाड ते गोवा सायकलिंग मोहीम हाती घेतली होती. गिधाड संवर्धन जनजागृतीसाठी महाड ते कच्छ सायकल प्रवासही केला होता. महाड ते पुणे, महाड ते महाबळेश्वर, महाड ते अलिबाग, अलिबाग ते कोळथरे अलिबाग- गोवा सागरी महामार्ग, महाड ते नागपूर अशा सायकल सफरीचे २० वर्षांपासून आयोजन करण्यात येते. पनवेल येथील निसर्ग मित्र संस्थेचे धनंजय मदन यांनी भारतभर सायकल भ्रमंती केली. संपूर्ण युरोपभर त्यांनी सायकल भटकंती केली; तर श्रीलंका आणि इतर २८ देशांमध्ये त्यांनी यशस्वी सायकल अभियान आयोजन केले आहे. अलिबाग येथील सायकल ग्रुपने देखील फ्रान्सपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची मजल मारली. असेच अनेक वैयक्तिक सायकलिंग करणारे सायकलवीर देखील वेगवेगळे प्रयोग करीत असतात. यामध्ये पनवेल येथील सिलिया मदन या युवतीने पनवेल ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते लेह लडाख भ्रमण यशस्वी केले. कोकणातील अशा सर्व सायकलप्रेमींनी एकत्र यावे यासाठी खेड येथे झालेल्या सायकल संमेलनात सायकलचे प्रकार, ओळख, माहिती, नवीन सायकल घेताना काय काळजी घ्यावी, सायकलिंग पेहराव, हेल्मेट, सायकल देखभाल व दुरुस्ती, दूरच्या सायकल प्रवासासाठी तयारी आदी बाबत नुकतीच माहिती दिली. महाडमधील नऊ ते अकरा वयोगटातील काव्या जोशी, ऋतू शिवदे, सारा राऊत, वीर जाधव, सारा शिवदे या छोट्या सायकलवीरांसोबत यश मास्कर, नीलेश गांधी, स्वरूप रावल, आर्यन शहा असे तरुण या रत्नागिरी जिल्ह्यातील संमेलनाचे आकर्षण ठरले होते. .... डॉक्टरांसाठी वेगळा गट सिस्केप संस्थेने महाडमध्ये खास डॉक्टरांसाठी सायकलिंग ग्रुप तयार केलेला आहे. दररोज सकाळी सर्व जण निसर्गाचा अनुभव घेत सायकलिंग करतात. नव्या ट्रेंडनुसार आता लहान मुलांपासून महाविद्यालयीन तरुणही आता सायकलने प्रवास करताना दिसतात. ...... सायकल चालवण्याचे फायदे हळूहळू सर्वांना पटत आहेत. रायगड जिल्ह्यात सायकल संस्कृती झपाट्याने वाढत आहे. मी गेली अनेक वर्षे सायकल चालवत आहे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या याचा चांगला परिणाम जाणवतो. - गणेश खातू, सायकलप्रेमी. ..........
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top