रायगड जिल्ह्यात कोविड कॉल सेंटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड जिल्ह्यात कोविड कॉल सेंटर
रायगड जिल्ह्यात कोविड कॉल सेंटर

रायगड जिल्ह्यात कोविड कॉल सेंटर

sakal_logo
By
रायगड जिल्ह्यात कोविड कॉल सेंटर जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील कार्यालयात सुरू महाड, ता. १० (बातमीदार) : रायगड जिल्ह्यामध्ये सद्य:परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचा तळमजला आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात कोविड-१९ कॉल सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सोमवारपासून जमावबंदीही सुरू झाली आहे. जिल्ह्यात तातडीने उपाययोजना राबवण्यात यावी, यासाठी कोविड-१९ कॉल सेंटर्स सुरू केले आहेत. दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी या कॉल सेंटरचा उपयोग होणार आहे. या कॉल सेंटरशी संपर्क साधून रुग्णांकरता बेडची स्थिती, व्यवस्थापन, रुग्णवाहिका, तसेच अन्य वैद्यकीय सुविधा याबाबतची माहिती मिळू शकणार आहेत. येथून वैद्यकीय मदत व मार्गदर्शनही मिळू शकणार आहे. सध्या अनेक कोरोना रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. विलगीकरणात असणाऱ्या अशा नागरिकांसाठी या कॉल सेंटरच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवला जाणार आहे. त्या नागरिकांच्या आरोग्य स्थितीची सतत माहिती घेतली जाणार आहे. त्यांना कुठल्याही मानसिक किंवा वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास ती तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबतही हे कॉल सेंटर मदत करणार आहे. --------------------------------------------------------------------- जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी प्रशासन सज्ज आहे. सरकारकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी नागरिकांनी करावी. - डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड .......... जिल्ह्यातील कॉल सेंटरची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय : ९४०४८१५२१८, ९४२१८५२२१८, ९४२३७१२२१८, ८२७५५४४२१८, अलिबाग तहसील : ०२१४१- २२२०५४ मुरूड तहसील : ०२१४४ - २७४०२६ रोहा तहसील : ०२१९४ - २३३२२२ महाड तहसील : ०२१४५-२२२१४२ सुधागड-पाली तहसील : ०२१४२-२४२६६५ श्रीवर्धन तहसील : ७२४९५७९१५८ कर्जत तहसील : ०२१४८- २२२०३७ उरण तहसील : ०२२-२७२२२३५२ खालापूर तहसील : ०२१९२-२७५००१ पनवेल तहसील : ०२२-२७४५२३९९ म्हसळा तहसील : ०२१४९-२३२२२४ पोलादपूर तहसील : ०२१९१-२४००२६ माणगाव तहसील : ०२१४०-२६२६३२ तळा तहसील : ७०६६०६९३१७ पेण तहसील : ०२१४३-२५२०३६
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top