महाडमधील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी सुखरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडमधील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी सुखरूप
महाडमधील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी सुखरूप

महाडमधील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी सुखरूप

sakal_logo
By

महाड, ता. २६ (बातमीदार) : युक्रेन आणि रशियामधील संघर्ष तीव्र झाला असून या दोन्ही ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. महाडमधील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून ते सुखरूप असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील २५ विद्यार्थी युक्रेन, रशिया या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले होते. नुकतेच दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्याने या ठिकाणी असलेल्या नागरिकांना मायदेशी परत येण्याचे आवाहन भारताने केले होते, मात्र तत्पूर्वी युद्ध शिगेला पोहोचल्याने अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले. यापैकी महाड तालुक्यातील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. युक्रेनची राजधानी कीव्ह येथे हे तिन्ही विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती पालकांनी दिली. महाडमधील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाज बिरादार यांचा मुलगा खुर्रम एजाज बिरादार, तर भाचा शोएब मौलासाब पठाण, तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे यांची मुलगी मुग्धा पद्माकर मोरे हे महाविद्यालयाच्या बंकरमध्ये सुखरूप असून व्हिडीओ कॉलिंगद्वारे पालकांशी संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top