Tue, March 28, 2023

अलिबाग ः बातमी नाताळ सण साजरा करणाऱ्यांवर राहणार पोलिसांची नजर
अलिबाग ः बातमी नाताळ सण साजरा करणाऱ्यांवर राहणार पोलिसांची नजर
Published on : 22 December 2021, 10:21 am
(केपी.................)
------------------
रायगडमध्ये जमावबंदीचा प्रस्ताव
नाताळ सण साजरा करणाऱ्यांवर पोलिसांची नजर
अलिबाग, ता. २२ (बातमीदार) : नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी यंदाही रायगड जिल्ह्याला मोठी पसंती दर्शविली आहे. महिन्याभरापासून जिल्ह्यातील हॉटेल, कॉटेजसाठी झालेले आगाऊ आरक्षण हेच दर्शवित असले तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर कोरोना नियमावलीचे उल्लंघन होऊ नये यासाठी रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमावबंदीचा प्रस्ताव पाठविला आहे.
२४ डिसेंबरपासून रायगड जिल्ह्यात पर्यटक येण्यास सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्याचे नियोजन केले आहे. वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत वाहन चालविण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
नाताळ साजरा करण्यासाठी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांना कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जमावबंदी लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जमावबंदीचे उल्लंघन होणार नाही, याकडे लक्ष देण्यात येणार आहे.
-----------------------------
नाताळ उत्साहात साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी वाहतूक शाखा व स्थानिक पोलिसांच्या मदतीने नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये याकडे लक्ष दिले जाणार आहे. यासाठी पथक तैनात केले जाणार आहे. हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याबाबत त्यांना सूचना करण्यात येणार आहेत.
- अतुल झेंडे, अपर पोलिस अधीक्षक, रायगड.
......................