कर्जत कल्याण राज्यमार्गावरील गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत कल्याण राज्यमार्गावरील गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्यांची मागणी
कर्जत कल्याण राज्यमार्गावरील गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्यांची मागणी

कर्जत कल्याण राज्यमार्गावरील गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्यांची मागणी

sakal_logo
By
कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्यांची मागणी कर्जत, ता. ३१ (बातमीदार) : कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील कर्जत ते नेरळ दरम्यान अनेक गतिरोधक आहेत. त्यावर पांढरे पट्टे रंगवण्याची मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेने निवेदनाद्वारे केली. पट्टे नसल्याने वाहनचालकांच्या गतिरोधक लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्यावर वाहने आदळून अपघात होतात, असे या निवेदनात नमूद केले आहे. कर्जत- कल्याण हा चौपदरी राज्यमार्ग आहे. त्यामुळे त्यावरून भरधाव वेगाने वाहने धावतात; परंतु या मार्गावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने त्यावर वाहने आदळतात. काही वेळा अपघातही होतात. काही महिन्यांपूर्वी अशाच एका अपघातात महिलेचा बळी गेला. त्यामुळे गतिरोधकांवर त्वरित पांढरे पट्टे रंगवावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बहुजन विद्यार्थी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top