कर्जतमध्ये उभे राहणार भव्य कामाख्या मंदिर

कर्जतमध्ये उभे राहणार भव्य कामाख्या मंदिर

Published on

कर्जत, ता.१९ (बातमीदार) : हिरवाईने नटलेल्या कर्जतची भूरळ श्रीमंतांपासून गरिबांपर्यंतच्या प्रत्येकालाच पडते. त्यामुळे या तालुक्यात आपले घरकुल असावे, असे त्यांना वाटते. पण, हेच कर्जत आता अन्य राज्यांनाही आकर्षित करत आहे. त्याचाच प्रत्यय हा शहरापासून जवळच असलेल्या पोसरी गावात उभ्या राहत असलेल्या भव्य कामाख्या मंदिरामुळे येत आहे. आसामच्या धर्तीवर हे मंदिर उभे राहणार असून त्याचे भूमिपूजन शुक्रवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्या हस्ते झाले.

पोसरी हे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे गाव. कामाख्या मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यात आमदार थोरवे यांनी सहभागी होत हिमंता बिस्वा यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.

विशेष म्हणजे या कामाख्या मंदिरासाठी आसाम येथून माती आणून हे मंदिर उभारले जाणार आहे. या मंदिर उभारण्यासाठी येणारा सर्व खर्च आसाम सरकार करणार असल्याची माहिती या सोहळ्याचे आयोजक रुपांतली बरुआ यांनी दिली.
भूमिपूजन सोहळ्याला नगरसेवक संकेत भासे, कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, मंदिराचे ट्रस्टी आदी मान्यवर उपस्थित होते .
...
पर्यटनाला चालना मिळणार
कर्जत तालुक्यातील गड किल्ले, लेणी, प्राचीन तलाव आणि मंदिरे आहेत. आता फार्म हाउस मोठ्या संख्येने उभे राहत असून कृषी पर्यटन केंद्रे आहेत. यामुळे मागील काही वर्षात कर्जत तालुक्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. तालुक्याला पर्यटनदृष्ट्या नवी ओळख मिळत आहे. त्यातच आता हे भव्य कामाख्या मंदिर उभारल्या जाणार असल्याने पर्यटकांसाठी अधिक एका पर्यटन स्थळाची भर पडून पर्यटकांना आसामला न जाताही तेथील कामाख्या मंदिराचे दर्शन तथा आनंद आता येथेच घेता येईल .
------------------------------------------------------------------------------------------
दोन तीन वर्षात कर्जत तालुका पर्यटन दृष्ट्या अधिक विकसित होत आहे. यासाठी मी अधिक प्रयत्नशील आहेत. त्यातच आता आसामच्या धर्तीवर येथे कामाख्या मंदिर उभे राहते ही पर्यटनाला अधिक बळ देणारे ठरून रोजगार निर्मितीसही पूरक ठरेल.
- महेंद्र थोरवे, आमदार, कर्जत विधानसभा मतदार संघ
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com