नेरळ कोलीवली येथे न्यानयज्ञ सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरळ कोलीवली येथे न्यानयज्ञ सोहळा
नेरळ कोलीवली येथे न्यानयज्ञ सोहळा

नेरळ कोलीवली येथे न्यानयज्ञ सोहळा

sakal_logo
By

कर्जत, ता. २८ (बातमीदार) : मानवी जीवनात चांगले काम करून कीर्तिरूपी उरावे. दुसऱ्याचे दोष दाखवून देण्यापेक्षा आपण किती गुणी आहोत, याचा विचार आधी करावा, असे आवाहन हभप उत्तम महाराज बढे यांनी केले. ते कर्जत तालुक्यातील नेरळ कोलिवली येथील अखंड ज्ञानयज्ञ सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

श्री संत वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने कोलिवली गावात अडीच दिवसांचा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात हरिकीर्तन, भजन, जागर भजन, प्रवचन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम सुरू होते. मिरचोली येथील श्री विठ्ठल-रखुमाई सेवा मंडळाने दररोज काकडा, भजन सादर केले. हभप हरिभाऊ महाराज पारधी आणि राजेंद्र महाराज जाधव यांनी कीर्तन; तर हभप ओंकार कराळे, हभप मधुकर महाराज कराळे यांनी प्रवचने सादर केली. श्री संतसेवा वारकरी संप्रदाय मंडळ आणि श्री संतसेवा वारकरी संप्रदाय मंडळ यांनी सामुदायिक हरिपाठ सादर केले. काल्याचे कीर्तन देवाची आळंदी येथील हभप उत्तम महाराज बढे यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष हभप दिगंबर तांबोळी, कार्याध्यक्ष हभप विजय महाराज पाटील, सचिव हभप ज्ञानेश्वर तांबोळी आणि खजिनदार शरद धुळे यांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top