
रेशन धान्य वाटप अखेर सुरू
अलिबाग, ता. १ : रेशन दुकानांतील ई-पॉज मशीनच्या मदतीने धान्याचे वितरण अधिक सुलभ व्हावे यासाठी सॉप्टवेअर अद्ययावत करण्याचे काम सुरू होते. यामुळे दुकानदारांना धान्याची नोंदच करणे अशक्य झाले होते. प्रकाराकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. त्यानंतरही ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात आली असून जिल्ह्यातील धान्य पुरवठा सुरळीत झाला आहे.
रेशन दुकानांतून धान्य मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील लाखो लाभार्थी हवालदील झाले होते. पुरवठा विभागाकडून वापरण्यात येणाऱ्या आरसीएमएस सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात येत होते. परंतु याची कोणतीही कल्पना रेशन दुकानदारांना न दिल्याने धान्य वाटपात गोंधळ उडाला. अशा वेळेला ऑफलाईन धान्य वाटप करणे गरजेचे होते, परंतु पुरवठा विभागाने कोणत्याही सूचना दुकानदारांना केली नव्हती. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले. यामध्ये लाभार्थ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाल्यावर शनिवारपासून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप सुरू झाले. सोमवारी सायंकाळी पुन्हा सॉप्टवेअर पूर्णपणे काम करू लागले
...................
रेशनद्वारे होणारे धान्य वाटपासाठी सॉफ्टवेअर अद्ययावत झाले आहे. ग्राहकांची माहिती वाढल्याने पूर्वीच्या सर्व्हरची क्षमता कमी वाटत होती. त्यामुळे सर्व्हरची क्षमता वाढविण्यात आली आहे. बुधवारपासून ग्राहकांना धान्य घेता येईल.
- मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड