Taliye village rehabilitation
Taliye village rehabilitationsakal media

रायगड : तळीये वसाहतींचे लवकरच पुनर्वसन; ९७ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर

महाड : गेल्या पावसाळ्यात महाड (Mahad) तालुक्यातील तळीये गाव (Taliye village rehabilitation) आणि अन्य वाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता या वसाहतींच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या (raigad zilha Parishad) बांधकाम विभागामार्फत तळीयेसह परिसरात सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ९७ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Taliye village rehabilitation
पालघरमध्ये कोंबड्यांचा तुटवडा; किलोमागे ४० रुपयांची वाढ

अतिवृष्टीमुळे २२ आणि २३ जुलैला दरड कोसळली. यामुळे तळीये गावांसह परिसरातील वाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. या दुर्घटनेत ८७ जणांचा मृत्यू झाला होता; तर ६६ घरांचे पूर्णतः नुकसान झाले. या घटनेमुळे तळीये गाव आणि इतर पाच वाड्यांना धोका निर्माण झाला आहे. या गावांचे व वाड्यांतील बाधित घरांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू केले आहेत. या पुनर्वसन ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत विविध कामे केली जाणार आहेत. त्यासाठी ९७ लाख ८२ हजार ७५४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

त्यामध्ये महाड तालुक्यातील तळीयेतील भाग एकची रायगड जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम करण्यासाठी ४२ लाख ९० हजार ४२ रुपये, रायगड जिल्हा परिषद शाळा भाग दोनचे बांधकाम करण्यासाठी १३ लाख ९२ हजार ७१२ रुपये, अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी १० लाख रुपये आणि बाजारपेठ बांधण्यासाठी ३१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तळीये व परिसरात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कामांमुळे या परिसरात आर्थिक व सामाजिक विकास साधण्यास मदत होणार आहे.

तळीये येथील रायगड जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी इमारत, बाजारपेठ या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेमार्फत ही कामे केली जाणार आहेत. त्यासाठी ९७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. कामांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकर याचे काम सुरू होईल.
- के. ई. बारदेस्कर, कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com