Home dreams
Home dreamssakal media

रायगड : बेघरांच्या घरांचे स्वप्न होणार साकार; दोन हजार ९६६ घरांचे उद्दिष्ट

Published on

अलिबाग : घरांपासून वंचित असलेल्या बेघर, तसेच अनुसूचित जाती, बौद्ध व अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना हक्काचे घर (own house) मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार (central and state government) पुरस्कृत घरकुल योजना सुरू आहे. यानुसार रायगड (raigad) जिल्ह्यासाठी दोन हजार ९६६ घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसह (Pradhan Mantri Awas Yojana) रमाई आवास योजना अशा अनेक प्रकारच्या घरकुल योजना यासाठी आहेत.

Home dreams
नवीन गृहप्रकल्‍प तहानलेलेच! सिडको वसाहतींच्या तोंडचे पाणी पळाले

सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून ग्रामीण भागात केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेतील सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी एक लाख २० हजार रुपये आणि डोंगराळ भागातील लाभार्थ्याला एक लाख ३० हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाणार आहे. या योजनेतून या आर्थिक वर्षात एक हजार ७५९ लाभार्थींना घरे बांधून दिली जाणार आहेत; तर अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील ३५० लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेतून घरे देण्यात येणार आहेत.

यामध्ये सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यासाठी एक लाख २० हजार रुपये व डोंगराळ क्षेत्रातील लाभार्थ्यासाठी एक लाख ३० रुपयांचे अर्थसाह्य दिले जाणार आहे. आदिवासी समाजातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शबरी आवास योजना राबविली जाणार आहे. याद्वारे ५४७ लाभार्थ्यांना यंदा घरे देण्यात येणार आहेत. कातकरी, कोलाम समाजातील ३१० लाभार्थ्यांसाठी आदीम आवास योजनेतून घरे बांधून दिली जाणार आहेत. जिल्ह्यात सुमारे तीन हजार घरे बांधण्याची संकल्पना आहे. ग्रामसभेच्या ठरावानंतर जिल्हा समितीच्या अंतिम निर्णयानंतर लाभार्थी पात्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com