Helmet
Helmetsakal media

सोमवारपासून हेल्मेट सक्ती; विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर होणार धडक कारवाई

Published on

अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यात सोमवारपासून हेल्मेट जनजागृती मोहीम (Helmet awareness campaign) राबवली जाणार असून याची सुरुवात सरकारी कार्यालयांपासून होणार आहे. विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर धडक दंडात्मक कारवाई (strict action) होणार आहे. हेल्मेट वापरण्याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच अंमलबजावणीसंबंधी व्यापक मोहीमही प्रादेशिक परिवहन कार्यालय (Regional transport office), उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने राबविण्यात येत आहे.

Helmet
पालघर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आठ दिवसांत एकही मृत्यू नाही

सुरुवातीच्या टप्प्यात या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था यांना सहभागी करून सरकारी कार्यालयात येताना विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोटार वाहन विभाग, तसेच स्थानिक पोलिस विशेष तपासणी मोहीम अधिक व्यापक करणार आहेत.

दरम्यान, हेल्मेट टाळण्यासाठी अनेक जण वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिसांना दाखवतात. मात्र, कायद्यात असे प्रमाणपत्र असेल तर हेल्मेट घालू नये याचा उल्लेख नाही. डॉक्टरांनीही असे प्रमाणपत्र देऊ नये. हेल्मेट सक्तीतून कोणीही सुटणार नाही, अशा सूचना रायगड पोलिस विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com