गावांमध्ये कुऱ्हाड बंदी

गावांमध्ये कुऱ्हाड बंदी
Updated on

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग : वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे ही कत्तल थांबविण्यासाठी ग्रामपातळीवरील संयुक्त वन समितीने पुढाकार घेतला असून यासाठी गावांमध्ये कुऱ्हाड बंदी घोषित केली आहे. वनांच्या रक्षणासाठी हा मैलाचा दगड ठरेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे; परंतु त्याला मोठ्या वृक्षतोडीमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभाग वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करीत असून गावांमध्ये झाडे न तोडण्याचे आवाहन करते.
वनांच्या संवर्धन व संरक्षणासाठी ग्रामपातळीवर वन विभागाने संयुक्त वन समिती सुरू केली आहे. वनांमध्ये होणारी झाडांची कत्तल रोखणे, वनांमधील पशू-पक्ष्यांची हत्या रोखणे अशा अनेक प्रकारची कामे करून वनांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला समितीने केला आहे.
आता जनजागृतीमुळे संयुक्त वन समितीने वनांमध्ये कुऱ्हाडीने होणारी झाडांची कत्तल रोखण्यासाठी कुऱ्हाड बंदीचा निर्णय घेतला आहे. या समितीने गावांमध्ये कुऱ्हाड बंदी सुरू केली आहे.
...
वावे येथे प्रयोग यशस्वी
अलिबाग तालुक्यातील वावे येथील संयुक्त वन समितीला राज्य सरकारचा संत तुकाराम महाराज उत्कृष्ट संयुक्त वन समिती पुरस्कार प्राप्त झाला आहे. नागाव येथील वनांच्या जागेत ‘पर्यावरण पर्यटन’सारखे उपक्रम सुरू केल्याने तेथील नागरिकांना रोजगार मिळाला आहे. झाडे वाढण्यास मदत झाली आहे.
-----------------
वनांमधील वृक्षतोड होऊ नये, आग लावू नये, यासाठी संयुक्त वन समितीची ग्रामपातळीवर निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य व वन विभागाचे कर्मचारी असतात. या समितीच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. झाडे न तोडण्यासाठी कुऱ्हाड बंदी, वणवे लागू नये यासाठी वेगवेगळे ठराव घेऊन वनांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न या समितीने केला आहे.
- विकास तरसे, वन परिक्षेत्र अधिकारी, अलिबाग
------------------
वनांचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. वावे येथील संयुक्त वन समितीच्या माध्यमातून झाडांची लागवड करण्याबरोबरच झाडांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला. जंगलातील लाकडे न तोडण्यासाठी गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. वनांमधील पशुपक्षांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी तलाव खोदाई करण्यात आली. जंगलात कोयता किंवा कुऱ्हाड घेऊन जाणाऱ्यांवर
अंकुश ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय समितीच्या माध्यमातून करण्यात आले.
- दत्तात्रेय तुरे, अध्यक्ष, संयुक्त वन समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com