Funding
Fundingsakal media

अलिबाग : वार्षिक आराखडा निधीचा शंभरटक्के विनियोग

अलिबाग : कोरोना कालावधीत (corona pandemic) ज्या विकास योजना पूर्ण झाल्या नव्हत्या, त्या पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करून रायगड (Raigad) जिल्हा वार्षिक आराखड्यातील १०० टक्के निधीचा विनियोग (hundred percent fund use) करण्यात जिल्हा नियोजन विभागाला यश आले आहे. पहिल्यांदाच या निधीचा विनियोग शंभर टक्के वापरात आला. सरत्या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यासाठी २७५ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला (Yearly plan) मंजुरी देण्यात आली होती.

Funding
ठाणे : शेतकऱ्याचा मुलगा झाला सीए

वार्षिक आराखड्यातील निधीचा विनियोग करण्यासाठी १६ आढावा बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्याचे बहुतांश विभागांनी पालन केले. त्यामुळे ३१ मार्चला दुपारी १ वाजताच शंभर टक्के निधी खर्ची पडला. त्यामुळे जिल्हा विकास निधी विनियोगात रायगड यंदा राज्यात अव्वल ठरला. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हे यश संपादन करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जवळपास ५० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करून ती कामे मार्गी लावण्यात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि नियोजन अधिकारी जे. एम. मेहेत्रे यशस्वी ठरले.

जिल्हा विकास निधीअंतर्गत सर्व विभागांना दिलेला निधी मार्चअखेरपर्यंत खर्च झालाच पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना दिल्या होत्या. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे जिल्हा विकास निधी खर्च करण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. त्यामुळे जवळपास १४ टक्के निधी समर्पित झाला होता. या वर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नेटाने प्रयत्न करण्यात आले.

Funding
आधीची योजना नव्या नावाने, प्रशासक येताच केंद्र सरकारचा शिवसेनेला दणका?

आमदार निधीतील ५० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आर्थिक वर्षांच्या अखेरच्या टप्प्यात आमदार विकास कार्यक्रमासाठी १० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधीही मार्गी लावण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आले आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी स्वत: कोषागार कार्यालयात जाऊन निधी विनियोगाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

आर्थिक वर्ष/ मंजूर निधी (कोटी रुपयांत) / खर्च/ खर्चाची टक्केवारी
२०१७-१८ / १७९.७० / १७९.२८/ ९९.८
२०१८-१९ / १८९.१७/ १८८.२४/ ९९.५
२०१९-२० / २११/ २०६.८८/ ९८.००
२०२०-२१ /२३४ /२०२/८६.४
२०२१-२२/ २७५/२७५/१००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com