RO RO Service
RO RO ServiceGoogle

रायगड : मुंबई-काशीद जलवाहतूक डिसेंबरपासून; व्यवसायाला नवे पंख देणारा प्रकल्प

अलिबाग : केंद्र सरकारच्या (Central Government) सागरमाला योजनेअंतर्गत (Sagarmala Yojana) मुरूड तालुक्यातील काशीद येथील जेटीचे काम (Kashid Port work) ५० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे काशीद ते मुंबई ही रो-रो सेवा (Raigad mumbai ro ro service) डिसेंबरपर्यंत सुरू होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्याच्या पर्यटन (Raigad tourism) व्यवसायाला नवे पंख देणारा हा प्रकल्प ठरेल. या प्रकल्पावर ११२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

RO RO Service
यशवंत जाधव प्रकरण: कॉर्पोरेट मंत्रालयाची मुंबई पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार

रुपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर किनारा, अशी काशीद समुद्रकिनाऱ्याची ओळख आहे. देश-विदेशातील पर्यटकांना त्याची भुरळ आहे. सुटीचे दिवस आणि आठवडा अखेर तर हा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून जातो. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराची संधी मिळते.
यामुळेच मुंबईतून थेट काशीदपर्यंत जलवाहतूक सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. अखेर त्याला मूर्त स्वरूप आले असून अवघ्या दोन तासांत हा किनारा गाठणे शक्य होणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने काशीद येथे जेटी बांधण्याचे काम हाती घेतले आहे.

केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत हा प्रकल्प असणार आहे. पार्किंग व्यवस्था, टर्मिनल इमारत अशी कामेही या ठिकाणी करण्यात येत आहेत. त्यामध्ये तिकीट सुविधा, प्रवाशांसाठी आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, जोड रस्ता, पाणी अशा अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे वेळेबरोबरच इंधनाची बचत होऊन पर्यटन वाढीला अधिक चालना मिळणार आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ११२ कोटींच्या या प्रकल्पाचे आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले असून ते डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.

काशीद ते भाऊचा धक्का या रो-रो प्रकल्पामुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच काशीद मुंबईच्या अगदी जवळ येणार आहे. रस्ता व अन्य सुविधांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- मनीष मेटकर, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com