
पालीतील आरोग्य शिबिरात ५२६ जणांची तपासणी
पाली, ता. २४ (वार्ताहर) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य सेवा व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवा अभियानांतर्गत पालीत नुकतेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये सुधागड तालुक्यातील ५२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. शिबिरातील गोंधळाच्या परिस्थितीमुळे प्रमुख पाहुणे आमदार अनिकेत तटकरे यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला.
शिबिराची वेळ सकाळी १० वाजता होती; परंतु सुरुवात ११ वाजता झाली. कार्यक्रमाची माहिती तालुक्यातील सर्वच नागरिकांपर्यंत पोचली नव्हती. त्यामुळे अनिकेत तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. तटकरे हे सकाळी नऊ वाजता पाली येथे पोहचले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ झाली.
तटकरे यांनी सांगितले की, सरकारच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे योग्य अंमलबजावणी होत नाही. शिबिरातही हे दिसून आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा, समन्वय समिती अध्यक्ष अभिजित चांदोरकर, नगरसेवक सुलतान बेनसेकर, सुधाकर मोरे, तहसीलदार दिलीप रायन्नावर, गटविकास अधिकारी विजय यादव, तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मढवी, रमेश साळुंके, गणपत सितापराव, संदेश शेवाळे आणि नागरिक उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..