Thur, March 30, 2023

पहिलीच्या प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा नाही
पहिलीच्या प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा नाही
Published on : 22 December 2021, 9:33 am
(केपी.................)
------------------
पहिलीसाठी कमाल वयोमर्यादा नाही
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढला नवा आदेश
मुंबई, ता. २२ : शालेय शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक आणि पहिलीची वयोमर्यादा निश्चित करून त्यासाठी धोरण आणले असले तरी कोणत्याही प्रवेशासाठी कमाल मर्यादा देण्यात आलेली नाही. त्यामुळे एखाद्या मुलाला वयावरून प्रवेश नाकारू नये, असे नवे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.
राज्यातील काही खासगी शाळांमध्ये पूर्व प्राथमिकच्या प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने १८ सप्टेंबर २०२० रोजी काढलेल्या प्रवेशाच्या वयासंदर्भातील शासन निर्णयाचा हवाला देत पूर्व प्राथमिकचे प्रवेश नाकारत आहेत, तर काही शाळांनी पहिलीचे प्रवेश सहा वर्षांहून अधिक झाल्याने नाकारण्याचे प्रकार केले आहेत. याविषयी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशाच्या वयासाठी लवचिक धोरण स्वीकारले जावे, असे आदेश दिले आहेत.
सोबतच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिकसाठी कमी-जास्त वयाचे कारण देऊन प्रवेश नाकारणे अपेक्षित नसल्याचेही संचालनालयाने म्हटले आहे.
...
लवचिकता ठेवा
१८ सप्टेंबर २०२० रोजी काढलेल्या प्रवेशाच्या वयासंदर्भातील शासन निर्णय हा केवळ पहिली प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने या निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करून दिलेली आहे. मात्र कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही, असे संचालनालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे.
...