Sun, March 26, 2023

महिला वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणारा आरोपी गजाआड
महिला वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणारा आरोपी गजाआड
Published on : 22 December 2021, 11:00 am
(केपी.................)
------------------
महिला कर्मचाऱ्याला
मारहाण; आरोपी अटकेत
कल्याण, ता. २२ (बातमीदार) ः कल्याण पूर्वेमधील वीजबिल थकीत असलेल्या ग्राहकांचे मीटर काढणाऱ्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण करून मीटर हिसकावून नेणाऱ्या आरोपीला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मोहनदास नायर असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी (ता. २०) काटेमानवली शाखेत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ सविता काटे या सहकारी विद्युत सहायक पल्लवी टोळे यांच्यासह काटेमानवली नाका परिसरात वीजबिल वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याचे काम करत होत्या. थकबाकीपोटी त्यांनी किरण लालवाणी यांच्या गाळा क्र. एकचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढला. या दरम्यान मोहनदासने महिला कर्मचाऱ्यांना जाब विचारत शिवीगाळ केली. तसेच सविता यांचे केस पकडून मारहाण केली व मीटर हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी काटे यांच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलिसांनी मोहनदास विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक मल्लिनाथ डोके करीत आहेत.