Tue, March 28, 2023

धारण तलावात डेब्रिज
धारण तलावात डेब्रिज
Published on : 22 December 2021, 10:25 am
धारण तलावात डेब्रिजचे ढीग
भरतीचे पाणी खांदा वसाहतीत शिरण्याचा धोका
पनवेल, ता.२२ (प्रतिनिधी) ः वसाहतींना भरतीच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी बांधण्यात आलेल्या धारण तलावात भराव टाकण्यात बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी झुगारून खांदा वसाहतीमधील सेक्टर १७ परिसरातील धारण तलावात डेब्रिज टाकले जात आहे. बिनदिक्कत सुरू असलेल्या या प्रकारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खांदा वसाहतीमधील सेक्टर १७ परिसरात सिडकोतर्फे धारण तलाव बांधण्यात आला आहे. भरतीचे पाणी वसाहतीत शिरू नये म्हणून बांधण्यात आलेल्या तलावात आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे निर्माण होत असलेले डेब्रिज सर्रास टाकले जाते. डेब्रिजमुळे धारण तलावाची क्षमता कमी होत असून वसाहतीला भरतीच्या पाण्याचा धोका निर्माण होत असून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तलाव परिसरात डेब्रिज टाकणाऱ्या वाहनचालकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी हेमंत जगताप यांनी केली आहे.
फोटो