शहापूर तालुक्यातील अन्यायकारक इक्को सेन्सिटिव झोनच्या विरोधात श्रमजीवी संघटनेची रॅली** | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर तालुक्यातील अन्यायकारक इक्को सेन्सिटिव झोनच्या विरोधात श्रमजीवी संघटनेची रॅली**
शहापूर तालुक्यातील अन्यायकारक इक्को सेन्सिटिव झोनच्या विरोधात श्रमजीवी संघटनेची रॅली**

शहापूर तालुक्यातील अन्यायकारक इक्को सेन्सिटिव झोनच्या विरोधात श्रमजीवी संघटनेची रॅली**

sakal_logo
By
(केपी.................) ------------------ इको झोनच्या विरोधात श्रमजीवीची रॅली खर्डी, ता. २२ (बातमीदार) ः ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा आदिवासीबहुल १०० टक्के पेसा क्षेत्र घोषित आहे. मात्र तरीदेखील २०१७ रोजी राजपत्र घोषित करून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्या क्षेत्राची मर्यादा १० किलोमीटरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आज शहापूर तालुक्यातील ६६ गाव हे इको सेंन्सिटिव्ह (अति संवेदनशील क्षेत्र) जाहीर केल्याने अनेक आदिवासी गावपाडे हे बाधित होत आहेत. सरकारच्या या अमानवी धोरणाविरोधी श्रमजीवी संघटनेने मंगळवारी (ता. २१) दुचाकी रॅलीचे आयोजन करून तिची सुरुवात शहापूर शीवतीर्थापासून केली. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, जिल्हा कातकरी उपप्रमुख मालु हुमणे, तालुका अध्यक्ष राजेंद्र म्हसकर, उपाध्यक्ष लक्ष्मण चौधरी, ईश्वर बनसोडे, सचिव प्रकाश खोडका, सेवादल प्रमुख रुपेश आहिरे व संघटनेचे ५५ मोटर सायकलस्वार अशी मोटर सायकल रॉली काढून शहापूर, चेरपोली, आटगाव, साखरोली, भावसे, अघई, वेडवाहाळ, सावरोली व वांद्रे या भागात जनजागृती करण्यात आली.