मुंबई : एलिफंटा बेटावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वोतोपरी सोयी | Elephanta caves | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gharapuri caves
एलिफंटा बेटावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वोतोपरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासकीय विभागांचा बैठकीत निर्णय

मुंबई : एलिफंटा बेटावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वोतोपरी सोयी

उरण : सरत्‍या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्‍वागतासाठी एलिफंटा बेटावर (Elephanta caves) दरवर्षी हजारो पर्यटक येतात. कोरोनामुळे (corona) गतवर्षी बेटावर पर्यटकांना प्रवेशबंदी होती; मात्र यंदा नियम शिथिल करण्यात आल्‍याने पर्यटकांची बेटावर गर्दी होऊ लागली आहे. पर्यटकांना योग्‍य सोयी-सुविधा (facilities for elephanta caves) मिळाव्यात, तसेच स्‍थानिकांनाही रोजगार मिळावा (employment) यासाठी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात यावी, अशी मागणी घारापुरी ग्रामपंचायतीचे (Gharapuri Gram panchayat) सरपंच बळिराम ठाकूर (Baliram thakur) यांनी पोलिसांकडे केली होती.

ग्रामपंचायतीच्या मागणीनंतर मोरा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश मोहिते यांनी मंगळवारी (२१) बेटावर विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीसाठी मेरीटाईम बोर्डाचे सहायक बंदर निरीक्षक संजय पिंपळे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, भारतीय पुरातत्त्व सहायक लेखाधिकारी विकास शिंदे, गेटवे-एलिफंटा जलवाहतूक संस्थेचे प्रतिनिधी रईस, एसआयएस सुरक्षा संस्‍थेचे सदस्‍य अजय मिश्रा, ग्रामपंचायत सदस्य मंगेश आवटे, मुकेश भोईर आदी उपस्थित होते.

कोरोना काळातील पर्यटक बंदीमुळे घारापुरी बेटावरील रोजगार ठप्प झाला होता; मात्र दोन महिन्यांपासून बेटावर पर्यटक सुरू झाल्याने बेटावरील रोजगार सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. चौकट बैठकीत विविध विषयांवर चर्चा घारापुरी हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असल्याने बेटावर लाखो देशी-विदेशी पर्यटक वर्षाकाठी येतात. नाताळ आणि नववर्षाच्या स्‍वागतासाठी पर्यटकांची गर्दी उसळल्यास त्‍यांना चांगल्‍या सोयी-सुविधा उपलब्‍ध व्हाव्यात, त्‍यांची गैरसोय टळावी तसेच ग्रामस्‍थांनाही रोजगारवाढीस प्राधान्य द्यावे आदींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Mumbai News