Fri, March 31, 2023

भिवंडी पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा.
भिवंडी पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा.
Published on : 22 December 2021, 11:47 am
ओके...बेलवाडकर...
------------------
सभापतिपदी भाजपचे महेंद्र पाटील
भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : भिवंडी पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली. भिवंडी पंचायत समितीमध्ये शिवसेना-भाजपची अघोषित युती आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने सभापतिपदाबाबत भाजप व शिवसेना यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार सभापतिपदी काल्हेर गणातून निवडून आलेले महेंद्र पाटील यांची निवड झाली. या वेळी तहसीलदार अधिक पाटील व गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी सभापतिपदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी भाजप आमदार महेश चौघुले, जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील, माजी आमदार योगेश पाटील, काल्हेरचे माजी सरपंच श्रीधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील, छत्रपती पाटील आदी उपस्थित होते.