नितेश तिवारीच्या आगामी चित्रपटात वरुण- जान्हवीची वर्णी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नितेश तिवारीच्या आगामी चित्रपटात वरुण- जान्हवीची वर्णी
नितेश तिवारीच्या आगामी चित्रपटात वरुण- जान्हवीची वर्णी

नितेश तिवारीच्या आगामी चित्रपटात वरुण- जान्हवीची वर्णी

sakal_logo
By
(केपी.................) ------------------ नितेश तिवारीच्या आगामी चित्रपटात वरुण-जान्हवीची वर्णी बॉलीवूडची धडक गर्ल जान्हवी कपूरने आपल्या मनमोहक अंदाजाने लाखो लोकांना भुरळ घातली आहे. जान्हवीला पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता जान्हवीच्या खात्यात नवा चित्रपट आला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारीच्या आगामी चित्रपटात जान्हवीची वर्णी लागली आहे. जान्हवी सोबत या चित्रपटात वरुण धवन देखील दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत. यामध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी जॉनरचा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप उघड झालेले नाही. या चित्रपटामध्ये वरुण आणि जान्हवीसोबत कोणते कलाकार दिसणार हे देखील गुलदस्त्यात आहे. पुढील वर्षापासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे.