शेहनाज हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेहनाज हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार?
शेहनाज हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार?

शेहनाज हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार?

sakal_logo
By
(केपी.................) ------------------ शेहनाज हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार? पंजाबी क्वीन शेहनाज गिलने कमी वेळेत तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला. तसेच ''बिग बॉस''च्या तेराव्या सीझनमध्ये झळकल्यानंतर तिचा चाहता वर्ग आणखीन वाढला आहे. बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिला मोठा धक्का बसला होता. त्यातून सावरण्यासाठी तिला खूप वेळ लागला. मात्र, आता ती सिद्धार्थच्या आठवणी सोबत घेऊन हळूहळू आपल्या आयुष्यात पुढे जात आहे. अलीकडेच तिने एक पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शेहनाज गिलने हॉलिवूड वेब शो ‘ल्युसिफर’चे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये शेहनाजसोबत वेब शोचा मुख्य कलाकार टॉम एलिस दिसत आहे. पोस्टरवरील फोटोमध्ये टॉम आणि शेहनाजची जोडी एकदम परफेक्ट दिसत आहे. त्यामुळे हे पोस्टर खरे आहे की फोटोशॉप्ड हे ओळखणेही कठीण आहे. शेहनाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ल्युसिफरचे पोस्टर शेअर केले आहे. ‘असली बिग बॉस तो यहां है...अशी कॅप्शन तिने पोस्टरखाली दिलेली आहे. त्यामुळे शेहनाज आता हॉलिवूड शोमध्ये दिसणार की काय, असा चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहेत.