''आरसा'' लघुपटाची पुरस्कारांची शंभरी.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''आरसा'' लघुपटाची पुरस्कारांची शंभरी....
''आरसा'' लघुपटाची पुरस्कारांची शंभरी....

''आरसा'' लघुपटाची पुरस्कारांची शंभरी....

sakal_logo
By
''आरसा'' लघुपटाच्या पुरस्कारांची शंभरी.... कर्करोगविषयक सामाजिक प्रबोधनात्मक निर्मिती केलेल्या काव्या ड्रीम मुव्हीज निर्मित ''आरसा'' या सामाजिक लघुपटाला विविध चित्रपट महोत्सवांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये एकूण ३१६ नामांकने आतापर्यंत मिळाली आहेत. त्यापैकी एकूण १०४ पुरस्कार या लघुपटाने पटकावले आहेत. पुरस्कारांची सेंच्युरी या लघुपटाने केली आहे. आरसा या लघुपटाचे लेखन आशिष निनगुरकरने केले आहे, तर गणेश मोडकने तो दिग्दर्शित केला आहे. ही एका मुलीची कथा आहे. तिच्या आईला कर्करोग होतो आणि त्यानंतर तिला समाजाशी कसे लढावे लागते हे मांडण्यात आले आहे. लेखक आशिष निनगुरकर म्हणतो, की आजकाल कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी ''केशदान''ही एक महत्वाची गोष्ट. या विषयावर काही तरी समर्पक संदेश देणारे लिहायला हवे, असे वाटले. मग ही गोष्ट सुचली. दिग्दर्शक गणेश मोडक यांनी ती उत्तमरीत्या मांडली. अभिनेत्री श्वेता पगार, गीतांजली कांबळी, चैत्रा भुजबळ, वैष्णवी वेळापुरे, डॉ.स्मिता कासार व संकेत कश्यप या कलाकारांची उत्तम साथ लाभली. या लघुपटातून कुठल्याही रोगाकडे व रोग झालेल्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. त्याला आधार द्यावा. हेच मोठे औषध असते. हा मुद्दा मांडला आहे. हा लघुपट बघून अनेकजण केशदानाचा संकल्प करून ती पूर्ण करत आहेत,हेच या लघुपटाचे यश आहे असे मला वाटते.