ट्रव्हल्स बसमधुन प्रवास करणाऱया दाम्पत्याची १० लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रव्हल्स बसमधुन प्रवास करणाऱया दाम्पत्याची १० लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी
ट्रव्हल्स बसमधुन प्रवास करणाऱया दाम्पत्याची १० लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी

ट्रव्हल्स बसमधुन प्रवास करणाऱया दाम्पत्याची १० लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी

sakal_logo
By
(केपी.................) ------------------ खासगी बसममधील प्रवाशाचे दहा लाखांचे दागिने लंपास नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : कर्नाटक येथून खासगी ट्रॅव्हल्स बसने मुंबईकडे निघालेल्या एका दाम्पत्याकडील १० लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बसमधील सहप्रवाशाने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी-बेलापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील तक्रारदार गौतमचंद लुनावत (वय ५३) हे व्यावसायिक कर्नाटक राज्यातील शिमोगा येथे राहण्यास आहेत. जानेवारीत लुनावत यांच्या मुलीचे लग्न असल्याने ते ७ डिसेंबर रोजी सोने खरेदीसाठी पत्नीसह ‘ईस्ट वेस्ट ट्रॅव्हल्स’च्या बसने मुंबईला येत होते. या वेळी लुनावत यांच्या पत्नीने सामानाच्या इतर बॅगेसह १३३ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याचा हार व नाकातील एक नथ सोबत घेऊन ते आपल्या सोबतच्या पर्समध्ये ठेवले होते. त्यानंतर दोघे खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये झोपून मुंबईच्या दिशेन येत असताना बसमधील एका सहप्रवाशाने लुनावत यांच्या पत्नीजवळ असलेल्या पर्समधील १० लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. बस सकाळी सातच्या सुमारास सीबीडी-बेलापूर येथे आली असताना, लुनावत यांच्या पत्नीला सर्व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड सुरू केल्याने बस थांबविण्यात आली. बसमधील प्रवाशांच्या बॅगेची तपासणी केली. मात्र, कुणाकडेही त्यांचे दागिने सापडले नाहीत. ... समाप्त