वर्षभरात १३३ कोटींची विदेशी दारु जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षभरात १३३ कोटींची विदेशी दारु जप्त
वर्षभरात १३३ कोटींची विदेशी दारु जप्त

वर्षभरात १३३ कोटींची विदेशी दारु जप्त

sakal_logo
By
ओके...बेलवाडकर... ------------------- वर्षभरात १३३ कोटींचे विदेशी मद्य जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २२ ः राज्य उत्पादन विभागाने वर्षभराच्या कालावधीत १३३ कोटींपेक्षा अधिक किमतीचे विदेशी मद्य जप्त केले. २०२० मध्ये केलेल्या कारवाईच्या तुलनेत यंदाच्या कारवाईत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. सीमेलगतच्या राज्यातून छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी केली जात आहे. त्यातही गोव्याहून होणाऱ्या तस्करीचे प्रमाण सर्वाधिक आहे. उत्पादन शुल्क विभागाने २०२० मध्ये राज्यात ४३ हजार ११३ ठिकाणी छापे मारले होते. त्यातून ९८ कोटी १९ लाख १९ हजार ४१३ रुपयांचे विदेशी मद्य जप्त केले; तर २७ हजार २८ जणांवर कारवाई करण्यात आली. यंदा जानेवारीपासून ते १५ डिसेंबरपर्यंत ४४ हजार ८१३ ठिकाणी छापे मारण्यात आले. त्यात १३३ कोटी ११ लाख ७२ हजार ५४८ रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले; तर ३१ हजार ९४२ जणांवर कारवाई करण्यात आली. --- वर्षभरातील प्रमुख कारवाया महिना--------------ठिकाण ---------------- किंमत एप्रिल ---- नागपूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ---२.३२ कोटी मे ---------तुर्भे, नवी मुंबई ----------------- १.४० कोटी ऑगस्ट -----सोलापूर------------------------२१ लाख सप्टेंबर -----कल्याण------------------------५० लाख नोव्हेंबर -----पुणे------------------------ --५२ लाख डिसेंबर ----- नंदुरबार---------------------- ६३ लाख --- नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात बंदोबस्त वाढवला आहे. परराज्यांतून येणारे, मुख्यत्वे गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या मार्गावर तपासणी सुरू केली आहे. - उषा शर्मा, संचालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग.