आयफोन १२ चे उत्पादन आठवडाभरासाठी ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयफोन १२ चे उत्पादन आठवडाभरासाठी ठप्प
आयफोन १२ चे उत्पादन आठवडाभरासाठी ठप्प

आयफोन १२ चे उत्पादन आठवडाभरासाठी ठप्प

sakal_logo
By
(केपी.................) ------------------ आयफोन- १२ चे उत्पादन आठवडाभरासाठी ठप्प फॉक्सफॉन प्रकल्प राहणार बंद चेन्नई, ता. २२ ः ॲपलच्या आयफोन- १२ ची निर्मिती करणारा फॉक्सकॉन प्रकल्प सात दिवसांसाठी बंद राहणार आहे. कांचिपुरमच्या पोलिस अधीक्षकांनी ही माहिती दिली. फॉक्सकॉन प्रकल्पात मागील आठवड्यात फूड पॉईझनिंगची घटना घडली होती. यात १५० कर्मचाऱ्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते. त्यामुळे फॉक्सकॉनला आठवडाभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, फॉक्सकॉन किंवा ॲपल प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ॲपलने नुकतीच आयफोन १३ ची सुद्धा निर्मिती या प्रकल्पात सुरू केली होती. मार्कट रिसर्च फर्म आयडीसीचे संचालक नवकेंद्र सिंह म्हणाले की, सध्या मंदी सुरू आहे. जिचा परिणाम फेब्रुवारीपर्यंत राहू शकतो. त्यामुळे प्रकल्प बंद ठेवण्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत जेव्हा नवीन उत्पादन होईल, तेव्हा विक्रीत वाढ होईल. त्यावेळी पुरवठ्याची गरज पडेल. फॉक्सकॉनचे काम बंद पडण्याची ही वर्षातील दुसरी वेळ आहे. २०२० मध्ये कंत्राटी मजुरांनी वेतन न मिळाल्याने साहित्याची मोडतोड केली होती. ज्यामुळे ४५५ कोटींचे नुकसान झाले होते.