गावित भगिनींची फाशीची शिक्षा योग्यच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावित भगिनींची
फाशीची शिक्षा योग्यच!
गावित भगिनींची फाशीची शिक्षा योग्यच!

गावित भगिनींची फाशीची शिक्षा योग्यच!

sakal_logo
By
गावित भगिनींची फाशीची शिक्षा योग्यच! सरकारचे उच्च न्यायालयात समर्थन सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २२ : निरागस बालकांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या आरोपात दोषी ठरलेल्या गावित भगिनींची फाशीची शिक्षा योग्यच असल्याचे समर्थन राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आज केले. नव्वदच्या दशकात कोल्हापूरमधील अंजनाबाई गावित आणि तिच्या दोन मुलींनी १३ मुलांचे अपहरण केले होते आणि त्यापैकी नऊ जणांची हत्या केली. या आरोपात त्यांना सन २००६ मध्ये फाशी सुनावण्यात आली. उच्च न्यायालय, तसेच सर्वोच्च न्यायालयाने ही फाशी कायम ठेवली. तसेच राष्ट्रपतींनीदेखील दोघींचा दयेचा अर्ज फेटाळला; मात्र अद्याप फाशीवर अंमलबजावणी झाली नाही. अंजनाबाई यांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला, तर रेणुकाचा नवरा किरण माफीचा साक्षीदार झाला होता. वीस वर्षांपूर्वी दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर अद्यापही अंमलबजावणी न झाल्यामुळे आरोपींना आता जीवन जगायचे आहे आणि त्यासाठी त्यांना दिलेली फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी रेणुका शिंदे आणि सीमा गावित या भगिनींनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली. त्यावर आज न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारने या याचिकेला विरोध केला असून दोघींचा गुन्हा भयावह आहे. त्यामुळे फाशी योग्य असल्याचे म्हटले आहे.