Sat, March 25, 2023

माहिती व जनसंपर्कच्या
महासंचालकपदी दीपक कपूर
माहिती व जनसंपर्कच्या महासंचालकपदी दीपक कपूर
Published on : 22 December 2021, 4:52 am
माहिती व जनसंपर्कच्या
महासंचालकपदी दीपक कपूर
मुंबई, ता. २२ : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून स्वीकारला. संचालक (प्रशासन) गणेश रामदासी यांनी कपूर यांचे स्वागत केले. यावेळी कपूर म्हणाले की, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच विविध समाजमाध्यमे देखील महत्त्वाची आहेत. माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येत्या काळात समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर करून सरकारच्या प्रतिमा निर्मितीचे काम करीत अचूकता आणि गतिमानतेवर भर द्यावा.