BMC
BMCsakal media

मुंबई : कैद्यांना विलगीकरणासाठी दिलेल्या शाळा पालिकेने मागीतल्या परत

मुंबई : कोविडबाधित (corona infected prisoners') कैद्यांच्या विलगीकरणासाठी (prisoners' quarantine) राज्य सरकारने (Maharashtra Government) ताब्यात घेतलेल्या महापालिकेच्या दोन शाळा (BMC School) अद्याप परत दिलेल्या नाहीत. महापालिका प्रशासनाने या शाळेचा ताबा मागितला असून, त्यावर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (collector office) करण्यात आली आहे. (bmc wants schools which are used for prisoners quarantine tenure)

BMC
कैद्यांना विलगीकरणासाठी देलेल्या शाळा मुंबई पालिकेने मागीतल्या परत

त्यातील एक शाळा दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करून वर्ग भरवले जात आहेत. कोविड काळात आर्थर रोड तुरुंगातील कैद्यांना बाधा होऊ लागल्याने त्यांच्या विलगीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेने भायखळा येथील दोन शाळा कैद्यांच्या विलगीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. भायखळा एस ब्रिज येथील महापालिकेच्या शाळेत ५०० विद्यार्थ्यी असल्याने त्यांना भायखळा पूर्वेकडील पालिका शाळेत स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. मात्र, पठाणवाला रोड येथील शाळेत २ हजार ५०० च्या आसपास विद्यार्थी आहेत.

ही शाळाही अद्याप जिल्हा प्रशासनाकडून पालिकेला दिलेली नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत आहे. शाळा उपलब्ध करून देण्याची विनंती पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला केली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनासोबत चर्चा झाली असून पाठपुरावा सुरू असल्याचे पालिकेच्या ‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज यांनी सांगितले.

पर्यायी जागेची मागणी जिल्हा प्रशासनाकडून पालिकेकडे पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवेतकर यांनी या माहितीला दुजोरा दिला. राज्य सरकारच्या निर्देशानुसार विलगीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासनाला केली होती, असेही त्यांनी सांगितले. सध्या १०० कैदी पालिकेच्या दोन्ही शाळांमध्ये मिळून १०० च्या आसपास कैदी सध्या तेथे आहेत. कैद्यांना ठेवायचे म्हणजे सुरक्षित जागेची गरज असते. अशी जागा दक्षिण मुंबईत मिळणे अवघड असल्याने हा पेच अधिकच वाढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com