हॉलीवूड स्टार समंथा लॉकवुडची मुंबईत झाली स्वप्नपूर्ती; भेटली 'या' अभिनेत्याला
मुंबई : हॉलीवूड स्टार समंथा लॉकवुडने (samantha lockwood) घेतली हृतिक रोशनची (Hrithik roshan) भेट हॉलीवूड स्टार आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री समंथा लॉकवुड काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) आहे. ती इथे आल्यापासून भारतीय मीडियामध्ये (Indian media) तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. मुंबईतील तिचे अनेक फोटो सोशल मीडिया (Photos on social media) पेजेसवर झळकताना दिसत आहेत. (hollywood star samantha lockwood dream came true meeting actor hrithik roshan in mumbai)
एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व आणि उत्कृष्ट अभिनय कौशल्य असलेली अभिनेत्री म्हणून समंथा हॉलीवूडची रॉयल्टी म्हणून ओळखली जाते. समंथा नेहमीच मनोरंजनाची चाहती राहिली आहे आणि बॉलीवूड मनोरंजनाने भरलेले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. बॉलीवूडचा क्रीश मोस्ट हँडसम अभिनेता हृतिक रोशनला भेटण्याचे तिचे दीर्घकाळचे स्वप्न होते.
अखेर तिची ती इच्छा पूर्ण झाली आहे. तिने नुकतीच हृतिकची भेट घेतली. यावेळचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना भेटून आनंदात दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या या भेटीचे रूपांतर कोणत्या नवीन चित्रपटात होणार का, हे जाणून घेण्यासाठी या दोघांचे चाहते उत्सुक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.