रेशन वाहतूकदारांची ओव्हरलोड वाहतूक
रेशन दुकान चालक मालक असोसिएशनची कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईसह उपनगरांमध्ये अन्नधान्य पुरवठा वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याचा आरोप मुंबई, ठाणे रेशन दुकान चालक मालक असोसिएनशनने केला आहे. यामुळे अपघाताच्या घटना घडू शकतात. त्यामुळे त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधित तक्रार ताडदेव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केली आहे.
मोटर वाहन कायद्यांतर्गत मालवाहतुकीचे नियम ठरवले आहेत; मात्र या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. निर्धारित वजनापेक्षाही राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या नियमांपेक्षा जास्त वजनाची वाहतूक कंपनीकडून केली जात आहे. या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. गेल्या काही वर्षांपासून वाहन नियम मोडून वाहन भार क्षमतेपेक्षा दीड ते दोन पटीने अधिक वजन वाहतूक करण्यात येत असल्याचा आरोप मुंबई ठाणे रेशन दुकान चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केला आहे.
कोट
क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्याची तक्रार रेशन दुकान चालक मालक असोसिएशनने केली आहे. त्यानंतर आता माहिती घेऊन त्यावर कारवाई करणार आहे.
- भारत कळसकर, आरटीओ, ताडदेव