मुंबई : अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी हायकोर्टात जनहित याचिका
मुंबई : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ( Annabhau sathe statue) यांचे स्मारक उभारण्यासाठी शासन निर्णय (Government decision) घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही. स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) जनहित याचिका (public interest litigation) दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने राज्य सरकारसह (Maharashtra Government) अन्य प्रतिवादी यांना याबाबत नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. साहित्यिक, कलावंत आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सार्वजनिक ग्रंथालय या संस्थेच्या वतीने न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. ( Public interest litigation in mumbai high court for Annabhau sathe statue)
२००३ पासून राज्य सरकारकडे अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. यापैकी काही मागण्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सहमती देऊन शासन निर्णयही झाला आहे. मात्र अद्याप त्यावर अंमलबजावणी केली नाही, असे याचिकेत म्हटले आहे. अण्णा भाऊ साठे यांचे घाटकोपर येथील घराचे सुशोभीकरण करणे आणि मुंबईत त्यांचे भव्य स्मारक उभारणे, अण्णा भाऊ साठे नामफलक असलेला एल.बी.एस मार्ग येथे प्रवेशद्वार बनविणे, जिजामाता उद्यान येथे खुले नाट्यगृह सुरू करून संस्थेला कायमस्वरूपी चालविण्यास देणे.
मुंबईत अण्णा भाऊ साठे यांच्या नावे ग्रंथालय उभारणे या पाच मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. यापैकी कोणतीही मागणी पूर्ण न केल्यामुळे ग्रंथालयाचे अध्यक्ष शहाजीराव थोरात यांनी याचिका केली. या याचिकेवर पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.